बांदा
मुंबईस्थित शेर्ले गावचे सुपुत्र अरुण धुरी व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शेर्ले शाळेतील सर्व बालकांना मोफत वह्यांचे वाटप केले. गेली ८ वर्षपासून अखंडपणे धुरी कुटुंबियांकडून शाळेत मोफत वह्यांचे वाटप करीत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी दातृत्वाचे शेर्ले सरपंच उदय धुरी, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.
यावेळी सरपंच महोदयांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेच्या समस्यान्विषयी खंत व्यक्त करत नजीकच्या काळात शाळेस सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच समिती अध्यक्ष विठ्ठल शेर्लेकर, यांनी ‘शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, अस सांगत शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. अरुण धुरी यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी झेंडे यांनी केले.
यावेळी गावचे सरपंच जगन्नाथ उर्फ उदय धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल शेर्लेकर,उपाध्यक्ष साईशा पराष्टेकर,समिती सदस्य सोनाक्षी मेस्त्री,साबाजी धुरी, तन्वी यादव, करूणा धुरी, सिद्धार्थ जाधव, समीक्षा आमडोस्कर, शाळेतील सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होत.