प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार
वेंगुर्ला :
स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील पुरस्कार मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या हद्दीतील मदर तेरेसा स्कुलने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पावलांवर पाऊल ठेवुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधून *स्वच्छ विद्यालय पुरस्कार* मिळवला याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर प्रा.सुनील नांदोसकर यांच्या हस्ते फादर अँन्थोनी डिसोझा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले शहराला स्वच्छतेची परंपरा आहे. येथील नागरिक मुले, शिक्षक यांना स्वच्छतेची आवड आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहरातील शाळा व महाविद्यालय हे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतात. गेल्या सात वर्षांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेचे राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार मिळवून एक स्वच्छतेचा “वेंगुर्ले पॅटर्न” बनवला. त्याची स्फुर्ती घेऊन मदर तेरेसा स्कुलने स्वच्छतेचा पुरस्कार मिळवला या बद्दल नगराध्यक्ष राजन गीरप यांनी अभिनंदन केले.
यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसॅडर प्रा.सुनील नांदोसकर यांनी मदर तेरेसा स्कुलचे कौतुक करताना शाळेच्या परीसरासोबत, शाळेतील पाणी, शौचालये ,हात धुण्याची सुविधा, देखभाल दुरुस्ती, कोवीड – १९ ची तयारी इत्यादी बाबतीत सर्व्हेक्षणात गुणांकण मिळवल्याबद्दल शालेय प्रशासनाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्लास्टिकमुक्त व प्रदुषनमुक्त वेंगुर्ले शहर बनविण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध होऊया असे आवाहन केले. यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी मदर तेरेसा स्कुलने १० वी च्या परीक्षेमध्ये १००% यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जि. का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर, रसीका मठकर व आकांक्षा परब, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस, बुथप्रमुख शेखर काणेकर, भुषण सारंग इत्यादी उपस्थित होते .