*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची अप्रतिम काव्यरचना*
*गंमत पावसातील*
चला चला रे सारे या
अंगणात जमूया
पावसाच्या सरींनी
अंग सारे भिजवुया
घुडुम् म्हताऱ्याआजीला
वर अवकाशात पाहूया
आवाज होता ढगांचा
कुशीत आईच्या लपूया
चमकणाऱ्या विजांपासून
दूर आपण राहूया
कोसळणाऱ्या धारांसंगे
पाऊस गाणे गाऊया
भरलेल्या डबक्यात
बेडूक उड्या मारूया
बेडकांच्या सूरात रे
सूर आपले मिसळूया
रानातल्या मयुरासम
सुंदर नृत्य करूया
पडणाऱ्या सरींनी
आजीचे मडके भरूया
इंद्रधनूच्या कमानीखाली
एक सेल्फी घेऊया
झुळझुळ वाऱ्यासवे
थेंब पावसाचे झेलूया
वाहणाऱ्या पाण्यामध्ये
कागदी होड्या सोडूया
हिरव्यागार सृष्टीमध्ये
मग आनंदाने डोलूया
*✒️©आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*