सिंधुदुर्गनगरी :
दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, आपतकालीन कमिशनड अधिकारी, शॉर्ट सर्व्हिस कमिशनड अधिकारी, स्वेच्छा निवृत्तीधारक ज्यांना माजी सैनिकांचा दर्जा प्राप्त झालेला आहे, यांनी इ.सी.एच.एस. सदस्यत्वासाठी लवकरात लवकर आपले ऑनलाईन आवेदन सादर करावे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
इ.सी.एच.एस. सभासद झाल्यानंतर आवश्यक त्या वैद्यकिय सुविधा प्राप्त होणार आहेत. तसेच सदर योजना पूर्वीप्रमाणेच कार्यरत आहे. तरी या याचा लाभ वरीलप्रमाणे निवृत्तीधारक व त्यांच्या विधवा पत्नीने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.