You are currently viewing मनसे नेते अमित राज ठाकरे यांचा संघटना पुनर्रबांधणीसाठी सिंधुदुर्ग दौरा

मनसे नेते अमित राज ठाकरे यांचा संघटना पुनर्रबांधणीसाठी सिंधुदुर्ग दौरा

कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..

 

सिंधुदुर्ग :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्यात संघटना पुनर्बांधणीकडे लक्ष वेधले असून त्यांच्या नियोजित कोकण दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून होणार आहे. दि 5 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथे सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग पदाधिकारी बैठक, 6 जुलै सकाळी 11 वाजता कुडाळ येथे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक तर दुपारी 3 वाजता कणकवली येथे कणकवली-वैभववाडी-देवगड असा मतदारसंघ निहाय पदाधिकारी बैठका व संघटनेचा आढावा घेणार आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील शिक्षण संस्था,महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करणार असून पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत.तरीही मनसेच्या सर्व सेलच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + eleven =