कुडाळ
कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे स्थानिक नाल्यावर लघू पाटबंधारे तलाव सन 1996 मध्ये जलसंधारण विभागाकडे मंजूर होते. सन 1996 मध्ये सदरच्या योजनेसाठी रु. 4,04,78,456/- एवढी मुळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु सदरची योजना अदयाप कार्यन्वयीत होत नव्हती. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी मा. खासदार श्री. विनायक राऊत यांचेकडे सदरचे तलाव होण्यासाठी आग्रही मागणी करीत होते. मा.खा.श्री. विनायक राऊत यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करुन सदरच्या तलावासाठी रक्कम रु. तेहत्तीस कोटी एकसष्ट लक्ष त्र्याण्णव हजार आठशे पंचावन (33,61,93,855/-) एवढा निधी दि. 1 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर करुन घेतला आहे. सदरचा तलाव पूर्ण झाल्यानंतर सदरच्या तलावात 2159.25 स.घ.मी इतका पाणीसाठा होवून एकूण 168 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. तसेच या गावातील जमिनीतील पाण्याची पातळी वाहून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. 168 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून कृषी क्रांती सहज शक्य होणार आहे.
त्यामुळे आंब्रड परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांचेकडून मा.खा.श्री. विनायक राऊत यांचे आभार व्यक्त करीत आहेत.