बांदा
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूलला जिल्हास्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय २०२१-२२ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी हा पुरस्कार शाळेच्या वतीने स्वीकारला.
शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला एकूण स्वच्छता या विभागात देखभाल व दुरुस्ती या उपविभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
जाहीर केलेल्या स्वच्छ विद्यालय २०२१-२२ जिल्हा पुरस्कारा मध्ये एकूण १७११ पैकी १६१० शाळांनी नोंदणी केली होती पैकी ३८ शाळांची निवड झाली होती त्यातून ११ शाळांना स्वछ विद्यालय पुरस्कार मिळाला. यामध्ये ही शाळा असल्याने कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई चे चेअरमन मा. मंगेश
कामत ,ट्रस्टी मा. प्रशांत कामत,सर्व कमिटी मेंबर्स, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.या प्रशाळेच्या कार्याची शासनाने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.