गुलाब पुष्प व मिठाई भरवून शेतकऱ्यांना दिल्या कृषी दिनाच्या शुभेच्छा…
मनसेच्या सन्मानाने शेतकरीही भारावले
सिंधुदुर्ग :
1 जुलै रोजी जागतिक कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुलाब पुष्प देत मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. शेतकरी वर्ग देखील मनसेच्या सन्मानाने भारावून मनसे पदाधिकाऱ्यांचे मनोमन आभार मानले.
यावेळी अनियमित पाऊस, खतांच्या वाढलेल्या किंमती आदी सर्व समस्यांवर शासनाने लक्ष देण्याची गरज असून, चपलांचे मॉल बनले मात्र शेतकरी अजून रस्त्यावरच विक्री करतोय हे बदलणं गरजेचं असून नुसतं “जय जवान जय किसान” नारा देऊन उपयोग नाही तर परत जगाचा पोशिंद्यावर लक्ष देऊन खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीची गरज असल्याची भावना मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,विभाग अध्यक्ष अनिल कसालकर,प्रसिद्धी प्रमुख गुरू मर्गज,नितीन जाधव,प्रगतशील शेतकरी दिलीप पालव आदी उपस्थित होते.