नांदगाव प्रतिनिधी
आज सर्प – इंडिया या संस्थेला १२ वर्ष पूर्ण होत आहेत…. या यशस्वी १२ वर्षाच्या प्रवासात सर्वांचा सहभाग नेहमी मोलाचा
राहिला आहे ..
या संस्थेला आज जे एका मोठ्या परिवाराचे स्वरूप मिळाले आहे ते आपल्या सगळ्यांच्या अथक प्रयत्न, परिश्रम आणि १००% निस्वार्थ सहभागाचे फळ आहे …
याच दिवसाचे औचित्य साधून आज नांदगाव दशक्रोशितील सर्पमित्र यांनी एकत्र येऊन नांदगाव येथील सर्प मित्र बंटी पाटील यांच्या निवासस्थानी केक कापून १२ वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे.
यावेळी सर्व सर्पमित्र यांनी असं आवाहन केलं आहे की, सध्या पावसाळा सुरू आहे तसेच शेतीची कामे ही सुरू आहे तरी या काळात कुठल्याही जातीतील सर्प आढळून आल्यास जवळच्या सर्प मित्र यांना बोलावून त्या सर्पांना जिवदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी सर्पमित्र व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, राजेश भोगले, सत्यवान चव्हाण, महेश तळेकर,राजू वायंगणकर, अक्षय मेस्त्री,अक्षय निकम, बंटी पाटील,मयुर राणे, मंदार राणे, आनंद म्हसकर,भाई मोरये, विठ्ठल बिडये, मंगेश पाटील, सुदेश पाटील,रिध्देश तेली,सुदेश तोरसकर,संजय नेरुरकर,नंदू मोरये संतोष चव्हाण, अक्षय म्हसकर आदी सर्पमित्र उपस्थित होते.