You are currently viewing किरकोळ केरोसिन परवानासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

किरकोळ केरोसिन परवानासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

सिंधुदुर्गनगरी,

 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील खालीलप्रमाणे नमुद केलेल्या तालुक्यातील केवळ किरोळ केरोसिन दुकान परवाने मंजूरीकरिता दि. 1 जूलै 2022 राजी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.किरकोळ केरोसिन परवाना मंजूर करावयाचे तालुका सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली, या क्षेत्रातील पंयायत, बचत गट, सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात दाखल करावेत.

            सदरचा जाहिरनामा गावातील तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कार्यालय व विविध कार्यकारी सोयायटी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावा.तसेच गांव दवंडी देऊन त्यास प्रसिध्दी देण्यात यावी.  जाहिरनामा तहसिलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावा. अर्जाचे कोरे नमुने विहित फी घेऊन उपलब्ध करुन द्यावेत. विहीत मुदतीत भरुन प्राप्त होणारे अर्ज त्यावर दाखल तारीख घालून स्वीकारण्यात यावेत व प्राप्त सर्व अर्जाची छाननी, जागेजी तपासणी व इतर आवश्यक चौकशी करुन त्याबाबत छाननी पत्रक तयार करुन प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासही दि 31 ऑगस्ट 2022 पूर्वी या जिल्हा पुरवठा कार्यालयत सादर करावा. अशी माहिती जिल्हा पूरवठा अधिकारी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा