You are currently viewing मळेवाड ग्रामपंचायतीने साजरा केला डॉक्टर्स डे

मळेवाड ग्रामपंचायतीने साजरा केला डॉक्टर्स डे

सावंतवाडी

डॉक्टर डे निमित्त गावातील सर्व डॉक्टरना ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
१ जुलै अर्थातच डॉक्टर डे आणि कृषी दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. यावेळी गावात गावात चांगली वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर यांनी कोरोना काळातही विशेष कौतुकास्पद काम केले याबद्दल मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी डॉ गणपत टोपले,डॉ आर व्ही कामत,डॉ नमिता धुरी,डॉ विद्याधर सावंत,डॉ अदिती ठाकूर,डॉ नागोरे या सर्व डॉक्टरांची भेट घेवून डॉक्टर डॉक्टर डेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच गावातील रुग्णांसाठी आपण अतिशय उत्तम रित्या वैद्यकीय सेवा देतअसून कोरोना काळातही आपण सर्व डॉक्टरनी कौतुकास्पद काम केलेले आहे याबद्दल आम्ही ऋणी आहोत अशी भावना उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केली.यावेळी कृषी दिनाच्या औचित्य साधून त्यांना सुपारीच रोपही भेट देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा