सिंधुदुर्गनगरी :
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या हयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी दिली.
ज्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेतात, त्या बँकेमध्ये सादर करावे. तसेच 1 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा, याची सर्वसंबंधित निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.