देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
भाजपमध्येच अंतर्गत कलह?
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी शिल्लक असताना भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे अशी केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचे बोलून दाखविले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून दिसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यापूर्वीच राहिले होते. त्यामुळे महाराष्ट्रात नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणे निश्चितच त्यांना कमीपणाचे होते. कदाचित त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार व मंत्रिमंडळावर लक्ष ठेवणार असे पत्रकार परिषदेत घोषित केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर काहीच वेळात भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया देताना केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय जाहीर केला व केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी बसण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री म्हणून दिसण्याची शक्यता आहे. राजकारणातील एक हुशार नेतृत्व म्हणून गेले एक दशक देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. केंद्रीय नेतृत्वाचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेला विश्वास आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील असलेली जाण यामुळेच केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र भाजपाची जबाबदारी देत उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार असे घोषित केले तर दुसरीकडे केंद्रीय नेतृत्वाने अवघ्या काहीच मिनिटांत देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी बसण्याचा आदेश दिला, यामुळे भाजपमध्येच अंतर्गत कलह आहे की काय? असा संशय येत आहे.