कोकणचे नेते आमदार दीपक केसरकर होणार उपमुख्यमंत्री????
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपातून महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असलेले शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन महाविकास आघाडी सरकार पाय उतार झाले. राज्याच्या राजकारणात आज एक नवे वळण घेतले आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून 106 आमदार असलेला असलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाचे प्रमुख नेते माजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी घोषित करून एक मोठा सुखद धक्का दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारवर लक्ष ठेवून आला असे सांगून उपमुख्यमंत्री कोण याबद्दल मात्र गुपित निर्माण केलं.
धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य म्हणून राजकारणात आलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि कोकणातूनच महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री देणार अशी बातमी राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून गेले दहा दिवस शिंदे गटाची जबाबदारी आणि शिंदे गटाचे मत, म्हणणे योग्य प्रकारे महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवणारे शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे दीपक केसरकर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग वासीयांच्या मनात केसरकरांना उपमुख्यमंत्री पद मिळेल याची आतुरता वाटून राहिली आहे. दीपक केसरकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तर पहिल्यांदाच कोकणाला एवढा मोठा मान सन्मान मिळेल आणि नक्कीच कोकणात विकासाची गंगा येईल असे म्हणायला काहीच हरकत नाही.