You are currently viewing मातोश्री वर निष्ठा ठेवूनही वैभव नाईक यांच्या मतदार संघाच्या विकासाचा आलेख शून्यच – श्री विष्णू मोंडकर

मातोश्री वर निष्ठा ठेवूनही वैभव नाईक यांच्या मतदार संघाच्या विकासाचा आलेख शून्यच – श्री विष्णू मोंडकर

मालवण :

 

मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार श्री वैभव नाईक फक्त आणि फक्त मा.नारायण राणे साहेबांना विरोध दाखवून दुसऱ्या टर्म ची आमदारकी उपभोगत असून निष्ठा आणि दहशतवाद यांचा दिखाऊपणा करून काही वर्षांपूर्वी काँग्रेस मधून सेनेत प्रवेश केलेल्या श्री वैभव नाईक यांनि मतदार संघाचा विकास मात्र शून्यच केला. मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघ मा.श्री राणे साहेबांच्या काळात राज्यात विकासात उतरोत्तर अग्रेसर असताना मतदार संघाच्या विकासाचा आलेख गेल्या 7 वर्षाच्या काळात शून्यावर नेऊन ठेवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव कुडाळ मालवण असा मतदार संघ आहे की जो विविध प्रकाच्या उद्योगधंद्याचे प्रतिनिधित्व करतो आज कुडाळ एमआयडीसी मधील व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जगाशी स्पर्धा करत असताना स्थनिक व राज्य सरकारकडे मूलभूत गरजांसाठी धडपडत आहेत या मतदार संघातील मच्छिमार समाज मूलभूत गरजांसाठी तसेच अनधिकृत मासेमारी व्यवसायामुळे त्रस्त झाला असून त्यांची उपजीविकेसाठी धडपडत चालू आहे आज पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक जलपर्यटन ,होम स्टे,कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मालवण तालुका जगाच्या नकाशावर पोचविणाऱ्या स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना पुरोगामी व आवश्यक असलेल्या असलेल्या शासकीय पॉलिसी बदलासाठी धडपड करावी लागत आहे आज आरोग्य शिक्षण या क्षेत्रातही सर्व वानवा आहे. वास्तविक आमदार होऊन 8 वर्ष होत असून अजूनही मतदार संघाचा शाश्वत विकास संबंधी कोणतेही नियोजन किंवा प्रलंबित समस्या ऐकून घेण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी एवढ्या वर्षात एकही मिटींग घेऊ शकले नाही . कोरोना काळातही सर्व व्यापारी वर्गास कुठलीही मदत नाहमतदार संघाच्या विकास प्रक्रियेत आवश्यक असलेली कामे होत नसली तर दिखाऊ निष्ठा काय कामाची .तसे पाहता गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या अनैसर्गिक युतीच्या सत्तेवरून पायउतार होई पर्यंत पूर्ण जगाने सत्तेचा मलिदा खाण्यासाठी सत्तेतील काँग्रेस राष्ट्रवादी व अन्य घटक पक्षानेही मातोश्री वर निष्ठा दाखवलेली पहिली आहे .खरे हिंदुत्व मा.हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या विचारधाराचे श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 पेक्षा आमदारांनी दाखवून इतिहास घडवला आहे श्री वैभव नाईक यांनी उर्वरित आमदारकीच्या काळात 100 टक्के आर्थिक गणितासाठी आमदारकी न वापरता मा .बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारणावर काम करून आपला कार्यकाळ पुरा करावा येणाऱ्या काळात मतदार संघातील जनता योग्य निर्णय घेइलच यात शंकाच नाही .

प्रतिक्रिया व्यक्त करा