You are currently viewing रक्तवाहिन्या मृत्यू सापळा

रक्तवाहिन्या मृत्यू सापळा

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

आपल्या गावाचा तालुक्याचा राज्य देश याचा विकास कशापासून होत असेल तर तो आपल्या शरिरात हजारों अशा रक्तवाहिन्या असतात तसेच आपल्या आजूबाजूला असणारे रस्ते हे सुद्धा रक्तवाहिन्या प्रमाणे काम करतात.
पुर्वी गावातून तालुका शहरं याकडे ये जा करण्यासाठी लोक पाऊलवाट याचा उपयोग करत होते . त्यानंतर थोडा काळ आणि वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन लोकांनी बैलगाडी साठी रस्ता तयार झाला आणि थोड्या प्रमाणात लोकांचे ये जा शेतमाल आणणे यासाठी लोकांना सुखकर झाले . अजून बदल होत गेला लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि कच्चे असणारे रस्ते शासनाकडून पक्के डांबरी करण्यात आले. आणि दोन चाकी गाड्यांचे प्रमाण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे वाढले. रस्ते रहदारी वाढली आणि हळूहळू हळूहळू चारचाकी गाड्या सुध्दा वाढल्या लोकांचा शहराकडे लोंढा वाढला. त्यामुळे वाहतूक वाढली . औद्योगिक क्षेत्रात विकास झाला. गावांचे रुपांतर शहरांत झाले. त्याचबरोबर सर्वांत मोठा अभिशाप असणारा लोकसंख्या भस्मासुर झपाट्याने वाढला लोकांच्या कडे पैसा वाढला गाडया वाढल्या आणि विकासासाठी गरजेचे असणारी रक्तवाहिनी आत्ता लोकांच्या मृत्यूचे कारणं होण्यास सुरुवात झाली. रांत्र दिवस सुरू असणारी शहरें रात्रभर सुरू असणारी वाहतूक यामुळे लोकांचे जीवन अपघातात बदलले. रस्ते सिमेंट क्रांक्रेटचे झाले . पाऊलवाट. गाडीरस्ता. दोन पदरी रस्ता. चारपदरी रस्ता. सहापदरी रस्ता. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ तयार झाले. यामुळे गाड्यांना वार्याची गती आली रस्त्यावर वाहनांची गर्दि झाली. अपघात रोखण्यासाठी शासन विविध कडक नियम करत आहे. कोणत्या वयात गाडी चालविणे गरजेचे आहे. तुमच्या वाहनांचे सपिड किती असायला हव. कोणत्या अपघातासाठी कोणती शिक्षा असायला हवी. गाडीचा विमा. वाहतूक नियम. आपण कधी पाळतो कां. अशा बेजबाबदार लोकांच्या मुळ आज फुटपाथवरून चालणारे. शाळकरी मुले. सकाळी फिरायला जाणारे यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
आपला जिल्हा सांगली जिल्हा आम्ही २०२१ मध्ये आम्ही केलेला रस्ते अपघातांचा सर्वे त्यानुसार सांगली जिल्ह्यातील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या ची संख्या प्रतिवर्षी वाढतच चालली आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत.आपला बेजबाबदार पणा कारणीभूत आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी स्वार आणि सकाळी फिरायला जाणारे मोकळ्या हवेत फिरणारे फुटपाथवरून चालणारे यांचा नंबर लागतो. म्हणजे रस्त्यावरून चालणे मुलांचे शाळेला काॅलेज विद्यालय महाविद्यालय जाणे तितकेच धोक्याचे झाले आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वे अहवालानुसार फुटपाथवरून चालण्याच्या अपघातांचे प्रमाण यांच्या ४५ घटना नोंदविल्या होत्या. वाहनांच्या पध्दतीनुसार अपघातांत ६० घटना. दुचाकीस्वार यांच्या मृत्यूच्या तर १६ टक्के पादचारी यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात २०२० मध्ये ५८८ विविध अपघात झाले. त्यात २७९ जण जागीच मयत झाले. २०१८/२०१९ मध्येही सांगली जिल्ह्यात फुटपाथ वरून चालणारे व पादचारी लोक यांच्या मृत्युच्या घटना बर्याच घडल्या लोकांनी रस्त्यावरून चालताना फुटपाथवरून चालतांना काळजी घेण गरजेचे आहे.
शहरांमध्ये कोणत्याही रस्त्यावर फुटपाथ शिल्लक नाही त्यामुळे धोका पत्करून नागरिक. विद्यार्थी.यांन रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या शहरांत भयानक वाढली आहे.
शहरातील सकाळी मोकळी हवा घेण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी बगिचे . मैदानावर फिरणं शरिराला लाभदायक असते. पण आज शहरातील मैदानावर आरक्षण पडली आणि मैदान संपली त्यामुळे सकाळी फिरणारे लोक यांना आज फुल्ल वाहतूक असणार्या रस्त्यावर फिरावे लागत आहे म्हणजे यामुळे सुध्दा बर्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शहरातील काही रस्त्यांच्या बाजूला फुटपाथ आहेत पण त्यावर दुकानदार यांनी अतिक्रमण केले यामुळे रस्ते लहान झाले. त्यातच फळें फुले भाजीपाला विक्री करणारे विविध वस्तू विकणारे यांनी फुटपाथवर कब्जा केल्यामुळे आज लोकांना चालण्यास सुध्दा अवघड झाले आहे.
२०२० चया अहवालानुसार सांगली व आसपासच्या ठिकाणी झालेले अपघात. यामध्ये . मृत्यू जानेवारी मध्ये ३०. फेब्रुवारी मध्ये ४३. मार्च मध्ये १८. एप्रिल मध्ये १०. मे २५. जून १७. जुलै ११. आॅगसट १७. सप्टेंबर १३. आकटोंबर २३. नोव्हेंबर २१. डिसेंबर ३२ अशा प्रमाणात जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले व त्यात फुटपाथवरुन चालणारे यांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे.
वाहतूक नियम पाळा. वाहन हळू चालवा. वाहन चालविताना दारु तंबाखू नशेच्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नका. अपघातग्रस्त लोकांना मदत करा. हे सर्व कागदावरच नको
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा