*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ भारती वाघमारे यांची अप्रतिम कथा*
*सुरक्षा मातेची*
पात्र
डॉक्टर-राघव
डॉक्टर -अंजली
गावातील महिला
कडबोळी नावाचं एक छोटंसं गाव होतं. डोंगर-दऱ्या च्या कुशित वसलेलं त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या .कोणी आजारी पडले तर जवळ दवाखाना नव्हता. शेजारच्या गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. पायी चालत जावे लागायचे .एखादी स्त्री गरोदर असेल तर तिच्या तब्येतीची हेळसांड व्हायची. घरगुती उपचार केले जायचे .घरी डिलेवरी व्हायची .त्यात त्यांच्या जीवाला धोका असायचा व कायमचा जीवही जायचा
एका कुटुंबातील राघव नावाचा मुलगा बाहेर गावच्या शाळेत शिकत होता. तो बाहेरच वस्तीगृहात राहायचा .तो खूप हुशार होता. अशातच त्याच्या बहिणीचा डिलेवारी मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला .त्याला खूप दुःख झाले. त्याने आपल्या गावासाठी डॉक्टर होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पैसे कमी पडत होते तर तो काम करून शिकला. आपल्या गावातील मुलगा डॉक्टर होतो हे कळल्यावर गावकर्यांनी मदत केली. पुढे तो डॉक्टर झाला .व त्याने आपल्या गावात दवाखाना उभा केला.त्यांनी आपल्या रस्त्याची सोय करून घेतली. एसटी महामंडळाकडून गावाला एसटी ची सोय करून दिली .आता त्या दवाखान्यात गरोदर स्त्रियांची तपासणी होत असे. एक दिवस राघवणे सर्व गरोदर मातांना गरोदर पणात काळजी कशी घ्यायची या विषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर अंजली यांना बोलावले .
एपिसोड—–१
डॉक्टर अंजली महिलांना सांगू लागल्या गर्भधारणेपासून प्रस्तुती पर्यंत चार तपासण्या कराव्या लागतात. गरोदर महिलांना प्रस्तुती पूर्वीची सर्व माहिती सांगते. आपण आहार काय घ्यायचा, कोणत्या वेळेत घ्यायचा, बाळाची वाढ कशी आहे, गुंतागुंत नाही ना हे तपासून पाहिले जाते तसेच सोनोग्राफी केली जाते. या काळात महिलांना कॅल्शियम कमी पडते तेव्हा तुम्हाला कँलशियमच्या गोळ्या दिल्या जातात.
तेव्हा गावातील महिला विचारतात :-डॉक्टर सोनोग्राफी म्हणजे काय? या गोळ्या कशा कशा पायी घ्यायच्या? आम्हाला काही होणार नाही ना ?आम्ही इथूनच मागे कधी घेतल्या नाही.
तेव्हा डॉक्टर अंजली म्हणतात:- तुमच्या आहारातून जे कॅल्शियम लोह तयार होते त्यातील काही तुमच्या बाळाला मिळते काही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला कमी पडते त्यामुळे तुमची कंबर अशक्तपणा कंबर दुखणे जाणवते तो जाणवू नये म्हणून या गोळ्या दिल्या जातात.
महिला विचारतात:- सोनोग्राफी म्हणजे काय?
डॉक्टर अंजली म्हणतात :-सोनोग्राफी म्हणजे एक ते टिव्ही सारखे मशीन असते त्या मशीन मध्ये बाळ सुखरूप आहे की नाही हे कळते. बाळाची वाढ कशी आहे ,काही गुंतागुंत नाही ना हे सगळे समजते तुम्ही आता काही घाबरू नका मी आहे ना तुमची काळजी घ्यायला मी जे सांगते ते तुम्ही नीट ऐका आणि तशीच काळजी घ्या.
एपिसोड—–२
गावातील महिला म्हणतात :-होय डॉक्टर तुम्ही लय भारी सांगितले तुम्ही सांगा आम्ही ऐकतो .
पुढे डॉक्टर अंजली म्हणतात :-दवाखान्यात पहिली भेट घेतल्यानंतर दुसरी भेट चौथ्या ते सातव्या महिन्या दरम्यान घेतली जाते व तिसरी भेट सात ते आठ महिन्यानंतर घेतली जाते चौथी भेट नव्या महिन्याच्या शेवटी घेतली जाते. 180 दिवसानंतर आय एफ ए टॅबलेट, कॅल्शियम,व जंतनाशक औषधे सुरू केली जातात.
गावातील महिला विचारतात :-आयएफ ए म्हणजे काय डॉक्टर?
डॉक्टर अंजली :-आय एस ए गोळी आहे या गोळी पासून अशक्तपणा कमी होतो व बाळाच्या आरोग्यासाठी वाढीसाठी उपयोगी असतात या गोळ्या चौथ्या महिन्यापासून नियमित घ्यायचे असतात. यापासून काही त्रास झाला तर डॉक्टरांना सांगावे गोळ्या बंद करू नये .हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी कॅल्शिअम गोळ्या घेणे आवश्यक असते .चौथ्या सहाव्या महिन्यात अशक्तपणा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. समजलं का सगळ्यांना सगळ्या
महिला म्हणतात :-हो समजलं डॉक्टर
एपिसोड——३
डॉक्टर अंजली म्हणतात:- आता मी तुम्हाला काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे -गरोदर राहिलेल्यापासून डॉक्टरांकडे वेळेत तपासणी करून घेणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळाची आणि आईची सुरक्षित काळजी घेतली जाते. स्तनपान याविषयी माहिती दिली जाते आणि तुम्हाला दवाखान्यात आणण्यासाठी रुग्णवाहिकेची पण सोय केलेली आहे तुम्ही फक्त आम्हाला कळवा .तसेच तुम्ही गरोदर असल्याची माहिती आम्हाला कळवा व तुमचे नाव नोंदवा त्यामुळे आम्हाला तुमच्या साठी लागणाऱ्या सुविधा पुरवता येतील
महिला म्हणतात :-डॉक्टर लय भारी लय भारी झाले बघा गाडीची सोय केली बघा आता तुम्ही सांगणार तसंच करणार
एपिसोड—-४
डॉक्टर अंजली म्हणते:- ठीक आहे आता मी तुम्हाला आहाराविषयी सांगणार आहे .
महिला म्हणतात :-सांगा सांगा डॉक्टर
डॉक्टर अंजली सांगतात:- आपण जो आहार घेतो त्यातून बाळाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो तेव्हा आपण पोस्टीक व सकस आहार घेतला पाहिजे .
महिला म्हणतात:- पौष्टिक म्हणजे काय डॉक्टर?
डॉक्टर अंजली म्हणतात :-पौष्टिक म्हणजे आपल्याला आपल्या व बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार सकस चांगले जेवण
महिला म्हणतात :-वय काय डॉक्टर सबूत लय अवघड हाय ना तेव्हा विचारलं
डॉक्टर अंजली म्हणतात :- आता लक्षात ठेवा या काळात आहारामध्ये दूध दही हिरव्या पालेभाज्या फळे कडधान्य स्निग्ध पदार्थ यांचा समावेश केला पाहिजे त्यामुळे वजन वाढते ,चहा कॉफी चा वापर कमी करा. व्यसन करू नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर जेवण करा .
एपिसोड—–५
डॉक्टर अंजली सांगतात आता मी तुम्हाला काय करू नये गर्भधारणा स्तनपान या विषयी माहिती सांगणार आहे. सांगू ना
महिला म्हणतात :-हो सांगा.
डॉक्टर अंजली सांगतात :-गर्भावस्थेत बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा आहार घेतला पाहिजे. या काळात महिलांना अस्वस्थ वाटते .काही पदार्थांचा, फोडणीचा वास सहन होत नाही मळमळ-उलटी यासारखी लक्षणे आढळतात जेवण जात नाही त्यामुळे वजन वाढते तर कधी कमी होते त्यासाठी घाबरण्याची गरज नाही.
महिला म्हणतात:-होय काही महिला हो आम्हाला पण असा त्रास होत आहे, कशामुळे होतो डॉक्टर
डॉक्टर अंजली सांगतात :-हे सगळं गरोदरपणात आपल्या शरीरातील हार्मोन्स बदलामुळे होतं. घाबरायची गरज नाही.
महिला म्हणतात :-डॉक्टर दूध काजू दही खाल्ल्याने काही त्रास होत नाही ना त्याला अँलर्जी ते म्हणतात ना तसं होत नाही ना ?
डॉक्टर अंजली म्हणतात:- तसं काही होत नाही त्याची बाळाला दूध आणि दही यांची बाळाला व बाळाच्या आईला खूप गरज असते .
तसेच पपई आंबा अननस या सारख्या पदार्थात उष्णता असल्यामुळे शरीरात उष्णता तयार होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते त्यामुळे ही फळे शक्यतो खाऊ नये .
अति खाणे शरीरासाठी व बाळासाठी बाळाच्या आईसाठी हानीकारक असते. त्यामुळे यकृतावर परिणाम होतो. त्यासाठी निरोगी स्वच्छ व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे .गोळ्या घेतल्यामुळे मुलं रंगाची होतात हा आपल्या समाजात चुकीचा संदेश गेलेला आहे वास्तविक पाहता कॅल्शियम गोळ्या अशक्तपणा कमी करण्यासाठी यांचा उपयोग होतो .या गोळ्या शरीरास पोषक असतात त्यामुळे कोणतेही नुस्कान होत नाही.
महिला म्हणतात:- व्यायामामुळे बाळाला काही त्रास होतो का त्यावर
डॉक्टर अंजली म्हणतात- हा गैरसमज आहे बाळाला काहीच त्रास होत नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केला तर बाळाला काही त्रास होत नाही कारण व्यायामामुळे आपण फिट फिरत राहतो. प्रतिकारशक्ती वाढते. डिलिव्हरीसारख्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तयारी होते.शक्ति येते. व्यायाम ध्यान आणि योग योगासन यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते कोलेस्ट्रम फेकून देणे हे चुकीचे आहे
महिला विचारतात:- कोलोस्ट्रम म्हणजे काय?
डॉक्टर अंजली सांगतात :-कोलेस्ट्रॉल म्हणजे मातेला डिलिव्हरी नंतर जे दूध देतो त्याला कोलेस्ट्रम म्हणतात .ते फेकून देऊ नये कारण डिलेवारी नंतर एका तासात ते दूध बाळाला पाजावे त्यामुळे बाळाला जगण्याची व प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर असते .ही बाळाची पहिली लस असे समजावे .
महिला म्हणतात:- होय
एपिसोड——६
डॉक्टर अंजली सांगतात:- आता शेवटचं पण अति महत्वाचा मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका हे बाळासाठी खूप आवश्यक आहे.
महिला म्हणतात :-हो डॉक्टर सांगा आम्ही ऐकतो .
डॉक्टर अंजली सांगतात:- बाळंतपणानंतर आईला आलेले पहिले दूध फेकून देऊ नये कारण ते बाळाच्या प्रतिकारशक्ती साठी आवश्यक असते. ते दूध एका तासाच्या आत बाळाला पाजायचे असते .बाळाच्या जन्मानंतर बाळाला आईचा स्पर्श करावा. त्यामुळे बाळाचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते .व जिवाणू संसर्गापासून वाचण्यास मदत होते.
बाळ जन्मानंतर सकस हलका आहार घेणे आवश्यक असते.
त्यामुळे बाळाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी
व नवजात बाळाला लगेच मध साखरेचे पाणी घोटी देऊ नये कारण ते बाळाच्या शरीरासाठी हानिकारक असते
सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध पाजावे तसेच दुधाच्या बाटल्या तोटी यांचा वापर करू नये .
समजलं का सर्वांना
महिला म्हणतात:- हो डॉक्टर लई छान माहिती सांगितली बघा .असा आम्हाला कोणी बी नव्हतं सांगितलं .आम्ही आपली गावठी उपाय करत राहायचो. गावाजवळ सोय नसल्यामुळे आम्हाला काही सुविधा मिळाल्या नाही .डाक्टर तुम्ही आता इथेच हाय ना आम्हाला काही त्रास झाला तर आम्ही विचारू शकतो ना .
त्यावर डॉक्टर अंजली म्हणतात :-हो आता आमी डॉक्टर राघव यांच्या दवाखान्यात 24 तास आहे .तुम्हाला काही अडचन असेल तर कधीही केव्हाही माझ्याकडे या .
डॉक्टर अंजली ,डॉक्टर राघवला बोलवतात. डॉक्टर राघव तेथे येतात सर्व महिलांना नमस्कार करून म्हणतात तुम्हाला काय सांगितले ते कळले का?
महिला म्हणतात :-होय राघवा
डॉक्टर म्हणतात :-त्या सांगतील तसंच करा त्या आता इथेच राहणार आहे आणि हो अजून आनंदाची बातमी सांगायची मी तालुक्याच्या कार्यालयात अर्ज दिला आहे की प्रत्येकाच्या घरी पाणी लाईट पुरवावी म्हणून.
लवकरच ते काम पूर्ण होणार आहे .
एक महिला म्हणते:- होका राघवा लय झाक झालं बघ .लय लय आनंद झाला आहे.तू डॉक्टर नाही आमच्यासाठी तु देव आहे देव असं म्हणून महिला राघवला म्हणतात :-आता आम्ही येतो .(महिला जातात आणि आपापसात बोलतात कोणाचा पोट्टाआहे हा .एक महिला म्हणते:- आपल्या दरीतल्या शिवराम बाबाचा हाय हा होय का आपल्या गावासाठी देव देवच झाला बघ .देव त्याचं कल्याण करो .महिला गेल्यानंतर डॉक्टर अंजली ला विचारतात आमच्या गावच्या महिलांनी तुम्हाला जास्त त्रास तर दिला नाही ना
डॉक्टर अंजली म्हणतात :-नाही हो डॉक्टर सगळ्यांनी ऐकून घेतले
डॉक्टर राघव सांगतात-आमचाअडानी समाज आहे. पोटासाठी मरमर करावं लागतं लागतं तेव्हा दोन घास मिळतात .मला माहित आहे सर्व हकीकत जवळून पाहिलं सगळं. उपचाराविना लोक जग सोडून गेले
एक एक दिवस उपाशीपोटी झोपायचो .येथिल लोक फार मायाळू आहेत त्यांच्या ताटातल थोड थोड देतात एकमेकांना हे सारं पाहून काळीज पिळवटून जातं .या गावासाठी मला खूप काही करायचंय……। डॉक्टर अंजली म्हणतात:- डॉक्टर मला काहीच प्रॉब्लेम नाही खरं तर डॉक्टर तुम्ही या गावातील मातांची सुरक्षा केली कायमची. मला फार अभिमान वाटतो तुमचा .तुमच्या सारख्या अशा थोर माणसाबरोबर मला काम करायला नक्कीच आवडेल आणि मी ते काम मनापासून करेल त्या माता बहिणीची सेवा माझ्या हातून घडेल हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंतर मी तुमचे आभार मानायला हवे कारण तुमच्यामुळे मला या गावातील महिलांच्या समस्या कारणे आणि त्यांच्यासाठी काही करण्याची उमेद निर्माण झाली आता मी यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील आणि यांना चांगल्या सुविधा देईल. फक्त तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला साथ देईल डॉक्टर राघव खूप खूप धन्यवाद.
डॉक्टर राघव म्हणतात:-डॉ क्टर अंजली माझ्या गावासाठी तुम्ही येथे राहण्याची तयारी दाखवली खरतर मला या गावासाठी खूप काही करायचे आहे .हा गाव सुखी समाधानी व सर्व सुविधा पूर्ण करायचा आहे .यासाठी मी जिल्हा अधिकारी यांच्याकडे शिफारस करणार आहे. काही दिवसांनी डॉक्टर राघव जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करून सर्व सुविधा उपलब्ध करून देतात व सर्व गाव आनंदी होते .आता या गावात सुख नांदत आहे आणि डॉक्टर राघव त्यांचे डॉक्टर अंजली यांच्याशी विवाह केला आहे व हे कुटुंब या गावासाठी दिवसरात्र सेवा देत आहेत. सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.
भारती वसंत वाघमारे
राहणार -मंचर
तालुका -आंबेगाव
जिल्हा -पुणे
🌹🌹🙏🏻🌹🌹