You are currently viewing बांदा श्री विठ्ठल मंदिरात 2 जुलै पासून वीणा सप्ताह

बांदा श्री विठ्ठल मंदिरात 2 जुलै पासून वीणा सप्ताह

बांदा

बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवार्षिक ‘हरिनाम वीणा सप्ताह’ शनिवार दि.2 जुलै रोजी आरंभ होणार आहे. शनिवार दि.9 जुलै रोजी समाप्ती तर रविवार दि.10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. वीणा सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून गुरुवार दि.30 जुन रोजी श्रीमद भागवत पुराण ग्रंथाचा निरुपण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.ह.भ.प.श्रीपाद पणशीकर हे या ग्रंथाचे निरुपण करणार आहेत.

वीणा सप्ताह नियोजन प्रमुख प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पारप्रमुख व सेवेकरी यांची बैठक मंदिरात नुकतीच संपन्न झाली. यावेळी

विनीत पडते,दत्तप्रसाद पावसकर,श्रीप्रसाद वाळके,उमेश काणेकर,निलेश महाजन ,शुभम केसरकर , मंगलदास साळगांवकर, भाऊ वाळके ,उमेश मयेकर,रंजन वाळके,साईराज पावसकर ,

गौरव महाजन, मंथन विरनोडकर, प्रकाश प्रभु, आशुतोष भांगले, रोहित पेडणेकर,गिरीश नाटेकर आदी उपस्थित होते. यंदाच्या वीणा सप्ताहाच्या पारांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे. शनिवार दि.2 जुलै आळवाडा – विनित पडते, रविवार दि.3 देऊळवाडी -श्रीप्रसाद वाळके, सोमवार दि.4 हॉस्पिटल कट्टा – उमेश काणेकर,भाई शिरसाट ,मंगळवार दि.5 गांधीचौक – सुदन केसरकर,बुधवार दि.6 मारुती गल्ली – दत्तप्रसाद पावसकर,गुरुवार दि.7 निमजगा गवऴीटेंब – संदेश पावसकर,शुक्रवार दि.8 उभाबाजार -निलेश महाजन. शनिवार दि.9 रोजी दुपारी समाप्ती होणार असून रविवार दि.10 रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.

“श्रीमद् भागवत कथा निरुपण ज्ञानयज्ञ” कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध अष्टमी म्हणजेच दि.३०जुन ते ०७ जुलै २०२२ या कालावधीत श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे “श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ” संपन्न होणार आहे.यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जुन ते ६ जुलै दुपारी ३.०० ते ५.०० श्रीमद् भागवत कथा प्रवचन व श्रीमद् भागवत आरती व प्रसाद

दिनांक ०७ जुलै सकाळी ९.०० ते १२.०० ग्रहयज्ञ, श्रीमद् भागवत महायज्ञ

दुपारी १२.३० श्रीमद् भागवत आरती व तीर्थ प्रसाद.

तरी सर्व भगवद् भक्तांनी कथाश्रवणाचा तसेच या संपुर्ण सोहऴ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा