राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची मागणी..
कणकवली
कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल येथे हळवल, शिरवल या गावातील ६५ ते ७० शाळकरी विद्यार्थी एसटीने ये- जा करत असतात. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस थांबत जात नाही. यामुळे शाळकरी विद्यार्थ्याना कसरत करत शाळा गाठावी लागते. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९:३० वा. आणि संध्याकाळी ४:०० वा. या वेळेत बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, यांनी कणकवली आगार व्यवस्थापकांना केली आहे.
जादा एसटी बस सुरु झाली तर, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी, कृष्णा घाडीगांवकर, डेविड फर्नांडिस, रोहन सुद्रीक, मिलिंद सावंत, तुषार भोगले, मयूर दळवी, आदी कळसुली गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.