वेंगुर्ला (पेंडुर) :
वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर सरपंच सौ. गीतांजली गुंडू कांबळी यांच्या विरोधातील आदेशास स्थगिती देण्यात आली आहे. अपात्रतेच्या कारवाई विरोधात सरपंच सौ. गीतांजली कांबळी यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते.
ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधन धनादेशावर सही केली असतानाही,सरपंचांनी सदर धनादेशावर सही केली नाही. तसेच सरपंचाने इमारत क्रमांक ५१७ चे मालक बाबू लक्ष्मण आसोलकर असताना संतोष धोंडू तांडेल यांना सदर इमारत क्रमांक ५१७ चा उतारा धोंडू लक्ष्मण तांडेल यांच्या नावावर असल्याचा दाखला स्वतःच्या सहिने दिला. याबाबत तक्रार पेंडूर येथील नागरीक झीलू बाबाजी गावडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर पेंडूर सरपंच सौ. गीतांजली कांबळे यांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद हे 20 जून रोजी रद्द केल्याचा आदेश कोकण विभागाचे मुंबईतील विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिला होता.
याबाबत लवकरच सुनावणी होणार अशी माहिती महाराष्ट्र शासनाचे अवघड सचिव नीला रानडे यांनी दिली आहे.
काल आँनलाईन झालेल्या सुनावणीत सरपंच सौ. गीतांजली कांबळे यांनी कायदेतज्ञ यांच्या वतीने आपले म्हणणे दिले आहे.