जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना
पर्जन्या असाध्य होते तुजविण जीवन
मेघा बरस रे सर्वत्र समतोलत।।ध्रु।।
हाळा मारती तेव्हा उत्कंठा जाई वाढत
सागर जळाचे बनती मेघ उष्णतेनं
पहिल्या पावसाने सृष्टी होई सुगंधित।।1।।
पावसाचे ढग सत्य काढती उकलून
विजांचा लपंडाव टाकतो हेलावून
झिम्मा खेळू लागतो हिंदोलत तनमन।।2।।
अंग चिंब भिजल्यान शहारते तन
सृष्टीला करी संतृप्त वृक्षवेली तरारत
कृषिवल संतोषे करी शेती मशागत।।3।।
मेघश्यामासम असतो तो खोडकर
वेदना सुसह्य होते नातं जोडल्यावर
आनंद द्यायची ताकद असते पावसांत।।4।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677.