You are currently viewing चिमुरडी

चिमुरडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चिमुरडी*

 

बहु कष्टे सोनं उगवले

काळ्या मातीत मातीत

जवळचे नाते वसुंधरेशी

राबते घरदार जमिनीत

 

मिळाले नवे-नवे कपडे

दिसते ही चिमुरडी खुशीत

बैलगाडीतून उतरली

नाचत-गात जाणार मस्तीत

 

रस्यात असतील खडे

पायात नाहीत वहाणा

येईनात केस सावरता

आता नको कोणताच बहाणा

 

चढीन शेतातल्या आंब्यावर

पाडीन मिठूने खाल्लेला

देईन चारा विसावल्या बैलांना

खाईन भाकर तुकडा आणलेला

 

विजया केळकर _________

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा