You are currently viewing कुडाळ ग्रामीण रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप

कुडाळ :

 

रामकृष्ण पाताडे चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांच्यावतीने रुग्णांची सोय व्हावी या उद्देशाने कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे चेअरचे वाटप करण्यात आले.

रामकृष्ण पाताडे चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे ही संस्था सामाजिक काम करत असून यावर्षी ट्रस्टच्या वतीने कुडाळ ग्रामीण रुग्णालय तसेच कुडाळ तालुक्यातील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय कुडाळ,प्रा. आ. केंद्र कसाल ,प्रा. आ.केंद्र पणदूर, मालवण तालुक्यातील केंद्र ,प्रा. आ.चौके ,केंद्र प्रा. आ.आचरा, प्रा.आ.केंद्र हिवाळे, वेंगुर्ले तालुक्यातील प्रा. आ. केंद्र तुळस, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे व्हील चेअर चे वाटप केले.

ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप रामकृष्ण पाताडे आणि सचिव स्नेहा संदीप पाताडे ,कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.पंडित यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयातील सहकारी उपस्थित होते.संदीप पाताडे यांनी आगामी काळात जिल्ह्यात ट्रस्टच्या वतीने असेच उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा