बैठकीत संघटनात्मक निवडी केल्या जाहीर
कुडाळ-
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम 27 जून 2022 रोजी भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रमुख उपस्थित कुडाळ येथील भाजपा कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी नवलराज काळे बोलत असताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचे नेते भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून भाजप भटके-विमुक्त आघाडीची स्थापना करण्यात आलेली असून या भटके-विमुक्त आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, भाजप भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली साहेब, आमदार नितेशजी राणे साहेब निलेश जी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाला अभिप्रेत असणारे कार्य आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करून दाखवू व येणाऱ्या काळात पक्षाला मोठी ताकद निर्माण करू देऊ त्याचप्रमाणे या आघाडीच्यावतीने भटके विमुक्त जाती व जमाती मध्ये येणाऱ्या सर्व जातींसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी, समाजावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढा उभा करून समाजाला न्याय देण्याचे काम करू असे प्रतिपादन करत जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये काही महत्त्वाच्या संघटनात्मक निवडी नवलराज काळे व विनायक राणे यांच्या शुभ हस्ते नियुक्त पत्र देऊन जाहीर करण्यात आल्या यावेळी मालवण तालुका अध्यक्षपदी शांताराम उर्फ बाळा गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष पदी कुडाळ तालुक्याचे सुरेश झोरे, तर जिल्हा सघटनमंत्री पदी मालवण तालुक्याचे सुनील खरात यांची निवड करण्यात आली. उपस्थितांकडून नवनियुक्त पदाधिकार्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी इतर मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळ मंडळाचे अध्यक्ष विनायक राणे, भाजपा भटके-विमुक्त आघाडी धनगर समाज जिल्हाध्यक्ष दिपक खरात, भटक्या विमुक्त हक्क परिषद चे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे,गोंधळी समाजाचे नेते राजू इंगळे, नवनिर्वाचित मालवण तालुका शांताराम ऊर्फ बाळा गोसावी, नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, नवनिर्वाचित जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, मालवण शहर शक्ती केंद्रप्रमुख श्री पांजरी, राजाराम पाटील, विनोद मुंगेकर , हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर, शैलेश मळेकर, विवेक परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.