औरंगाबाद (किंनगाव):
फुलंब्री तालुक्यातील किंनगाव येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय, कांचनवाडी या अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त बीजामृत, जीवामृत , पंचगव्या निर्मितीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त बिजामृत, जीवामृत , पंचगव्या यांचे प्रात्यक्षिके करून दाखवली.
तसेच कृषीविद्या विभागाचे विषयतज्ञ डॉ.एस.बी. सातपुते यांनी पिक उत्पादन वाढीसाठी जीवामृत, बिजामृत आणि पंचगव्या त्यांचा वापर कसा करायचा आणि त्याचे महत्त्व काय हे सांगितले.
शेतकऱ्यांना सेंद्रिय खते बनवण्यासाठी लागणारे साहित्य व ते बनवण्याच्या पद्धती यांबाबत जनजागृती व्हावी, यादृष्टीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिजीत वाघ, यश वाघ, ऋषिकेश वाघ, कृष्णा वाघ,अजय चव्हाण,नवनाथ गाडेकर,अजिंक्य भुसारी, आकाश फसले,अमित आर्दड,अमन मगर,तेजस जाधव,गणेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य डॉ. डी. के.शेळके , उपप्राचार्य डॉ.पी. बैनाडे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे, विषय तज्ञ डॉ. एस.बी. सातपुते व सरपंच अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते..