You are currently viewing महिलांसाठी प्रेरणा ठरली मिताली राज

महिलांसाठी प्रेरणा ठरली मिताली राज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘मन की बात’ मधून कौतुक

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्टार महिला क्रिकेटर मिताली राजचे कौतुक केले. मितालीने महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण करणारी मिताली तिच्या 23 वर्षाच्या कारकीर्दीत सर्वाधिक सामने खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना संगितले की, मिताली राज ही महिलांसाठी प्रेरणा आहे.

मिताली केवळ एक असामान्य खेळाडूच नाही तर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. मोदी यांनी मितालीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

*मितालीचे पराक्रम*

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून दीर्घकाळ भारताचे नेतृत्त्व केले आहे. मितालीने 155 एकदिवसीय सामन्यांमध्ये टिम इंडियाची धुरा सांभाळली. ज्यापैकी टीमने 89 सामने जिंकले आणि 63 सामने गमावले. तिने 8 कसोटी सामने आणि 32 टी- 20 सामन्यांमध्येही कर्णधारपद भुषविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा