मालवण (मसुरे):
दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे मसुरे येथील दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य घाट रस्त्यात मधोमध रविवारी सकाळी भले मोठे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. सततच्या पावसामुळे तसेच सोसाट्याच्या वारा मुळे मसुरे दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य घाट रस्त्यावर डोंगराळ भागातील दरडीवरुन मोठाले झाड पडल्याने तसेच सायंकाळी उशिरापर्यंत अडथळा दूर न झाल्याने वाहने दुसर्या मार्गाने वळवली जात होती.