*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.भारती वाघमारे यांची अप्रतिम भावगीत रचना*
*मिळते मला खुशी रे*
वेड्या या मनाला समजावू कशी रे.
आठवणींच्या सागरात मिळते मला खुशी रे….।।ध्रु।।
रुसवा तुझा मला आवडतो फार.
सोड आता अबोला आनली नवी कार.
वाट पाहून तूझी वेडी मी झाली रे.
आठवणीच्या सागरात मिळते मला खुशी रे..।।ध्रू।।….१
, ओढ तुझी घेते रूदयात हुरहूर होते.
क्षणोक्षणी साजना आठवण तुझी येते.
वेड्या या मनाला समजाऊ कशी रे.
आठवणीच्या सागरात मिळते मला खुशी रे..।।ध्रु।।….२
सांजवेळ होता भास मला होतो.
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्षी चंद्र देतो.
चंद्र तारका घेऊन आल्या चंदेरी खुशी रे.
आठवणीच्या सागरात मिळते मला खुशी रे…।।ध्रु।।….३
हरवून भान जगीचे ओठे गीत गाते.
नयन मिटूनी पापणी स्वर्गी स्वप्न पाहते.
तुझे मधुर हसने मनी प्रित जागते रे.
आठवणीच्या सागरात मिळते मला खुशी रे…।।ध्रु।।…४
सौ भारती वसंत वाघमारे
राहणार -मंचर तालुका -आंबेगाव
जिल्हा -पुणे