सावंतवाडी
मागील दोन दिवसांपासून लागणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील जिमखाना जाधववाडी येथील घळण (मातीचा डोंगर) कोसळली. या जवळपास लोकवस्ती आहे. त्यामुळे लोकवस्ती मधील काही घरांना धोका निर्माण होऊ शकतो असे स्थानिक लोकांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मातीचा थर ( घळण)
कोसळली.घळण कोसळण्याचे प्रमुख कारण जिमखाना ग्राउंडची बाउंड्री वाढवण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी घडळणीची जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने काम सुरू ठेवले परिणामी आज ती घळण कोसळत आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात जाधववाडी वस्तीला बसणार आहे.
या कोसळत असलेल्या घळणी पासून फक्त वीस फुटाच्या अंतरावर जाधव वाडीतील लोकांची घरे आहेत. घळण कोसळत आहे. माती कोसळत आहे त्यामुळे शेजारच्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.
या भीतीने जाधववाडीतील लोक भयभीत झालेली आहेत जर नगरपरिषदेने यावर योग्य तोडगा न काढल्यास सर्व जाधव वाढतील लोक सावंतवाडी नगर परिषदेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
पाऊस दोन दिवसांपासून कोसळत आहे. अजूनही हंगाम बाकी आहे. त्यामुळे नगरपरिषदेने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केले आहे.