कणकवली :
कणकवली तालुक्यातील नागवे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कै.राजाराम मराठे कृषी विद्यालय फोंडाघाट येथील ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत आलेल्या १० कृषीदुतांचे नागवे ग्रामपंचायत वतीने स्वागत करण्यात आले.
यामध्ये तेजस पाटील, अक्षय बंडगर, बालाजी जोगदंड, सुरज रणदिवे, परवेज मुलानी, वैभव धायगुडे, प्रवीण कोळी, अक्षय रुपणर, प्रीतम पाटील, रणजित गडदे या कृषीदुतांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनीक् शेतीविषयक माहिती पर कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये पिकावर येणारे रोग, किटकांचे नियंत्रण, पशु पक्ष्यांचे लसीकरण, शेतिउत्पादनात होणारी घट , पेरणी, फवारणी, नवीन सिंचन तंत्रज्ञान आदी. विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून शेतीतून समृद्धीकडे नेण्यासाठी कृषीदूताकडुन प्रयत्न केले जाणार आहेत.