बांदा
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत बांदा पानवळ कॉलेजचे प्राध्यापक श्री रमाकांत गावडे यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक या शाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई दत्तक पालक योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी दत्तक पालक योजनेसाठी विद्यार्थिनी दत्तक घेता येता येते. श्री रमाकांत गावडे यांनी सहा हजार रुपयाचा धनादेश बांदा केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांचेकडे सुपुर्द केला.
यावेळी बोलताना प्राध्यापक गावडे यांनी बांदा शाळा जिह्यातील आदर्शवत शाळा असून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त विदयार्थीनी घेण्याचा आपला मानस असलयाचे सांगितले.आतापर्यंत बांदा केंद्र शाळेत 30विद्यार्थिनी दत्तक पालक योजनेच्या लाभार्थी झालयाआहेत बांदा शाळेतील जास्तीत विदयार्थीनींना हा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असललयाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांनी यावेळी सांगितले
यावेळी शाळेच्या वतीने गावडे आभार मानण्यात आले.यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक उपशिक्षक जे.डी.पाटील व पालक उपस्थित होते.