अमरावती
जिल्ह्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी उद्या 26 जून, रविवार रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत नियोजनभवनात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय मेळाव्यात उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण उपयुक्तता, कौशल्य विकास योजनांची माहिती व त्यांना प्राप्त होणाऱ्या रोजगार संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यातून मिळणाऱ्या रोजगार संधीची माहिती देखील देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराबाबत विविध कर्ज योजनाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षणामध्ये इच्छूक उमेदवारांची नोंदणी करण्यात येऊन येत्या काळात उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणात सहभागी देखील करण्यात येणार आहे.
तरी अमरावती जिल्हयातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी उमेदवारांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्याबाबत असे आवाहन सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.