जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे यांची अप्रतिम काव्यरचना
पुर्वी सगळ्यांकडे
घड्याळ नसायची
दारातील सावलिवर
अचुक वेळ ठरायची
शाळेची घंटा वाजली की
कामाची वेळ ठरायची
भाकरीची पाटी घेऊन
कारभारीन शेताची वाट धरायची
कारखान्याचा वाजला भोंगा की
दुपारची जेवणाची वेळ व्हायची
मुलं सगळी आट्या पाट्या धपाट्या,
खेळ मैदानात खेळायची.
सूर्य मावळतीला जाताना
सुट्टी कामाची व्हायची
घरी जाता जाता
दिवेलागणीची वेळ व्हायची.
घरी जाऊन कारभारीन
चुलीवर भाकरी भाजायची.
गरम भाजी भाकरी
पोटभर खायची.
काम करून दमल्यावर
लगेच झोपी जायची
कोंबड लागले आरवायला कि,
तेव्हाच सगळी उठायची.
आता तर बारा अंकी घड्याळ
सतत जवळ असत
तरिही कामाचे टाईम
टेबल
अचूक ठरत नसत
घड्याळ पाहिल्याशिवाय
वेळ कळत नाही
अलाराम वाजल्याशिवाय आपल्या दिवस उगत नाही.
सौ भारती वसंत वाघमारे
मंचर