You are currently viewing वैद्यकीय गर्भपात कायदा उल्लंघनाची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षिस

वैद्यकीय गर्भपात कायदा उल्लंघनाची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षिस

सिंधुदुर्गनगरी

शासन मान्यता नसलेल्या ठिकाणी अथवा अपात्र व्यक्ती, डॉक्टर गर्भपात करत असतील किंवा वैद्यकीय गर्भपात होईल अशी औषधे देत असतील तर ते बेकायदेशीर आहे. अशा बेकायदेशीर गर्भपात केंद्रांची किंवा कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या प्रकारांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते.

                वैद्यकीय गर्भपात कायदा 1971, कलम 4 अंतर्गत शासन मान्यता व नोंदणीकृत असलेल्या गर्भपात केंद्रांमध्येच अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक यांना विहीत पद्धतीचा अवलंब करून कायद्यामधील नमुद कारणांसाठी वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात तसेच गर्भलिंग निदान होत असल्यास त्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामध्ये द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

                वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यावर व तपासणीनंतर कायद्याचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास व पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केल्यानंतर खबरी बक्षीस योजनेंतर्गत माहिती देणाऱ्या खबऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा