You are currently viewing अंमली पदार्थांविरोधात शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा – अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे

अंमली पदार्थांविरोधात शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा – अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे

सिंधुदुर्गनगरी

अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्यांच्या दुष्परिणामांची माहिती सर्वत्र पोहचवावी, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले. जिल्हा पातळीवर अंमली पदार्थांचे सेवन व वापराविषयी परिणामकारक प्रतिबंधासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक आज झाली.

                याबैठकीस प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक अभिषेक पाल, सहाय्यक डाक घर अधिक्षक विनायक कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

                सर्व विभागांचा आढावा घेऊन श्री. बगाटे म्हणाले, पोस्ट विभागाने तसेच कृषी विभागाने संशयास्पद पार्सलची आणि लागवडीची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी. महसूल विभागाने आपल्या यंत्रणांमार्फतही आपल्या विभागातील लागवडीवर लक्ष ठेवावे. घनदाट अरण्याच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून तसेच अन्य खबऱ्यांच्या मार्फत लक्ष ठेऊन गांजाच्या लागवडीबाबत खात्री करावी. गांजाचा जमिनीवर कसा परिणाम होतो. तसेच अंमली पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामाबाबत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांमधून जनजागृती करावी. विविध स्पर्धा अभियानाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करावी.

                दोडामार्ग तालुक्यात विशेषतः घनदाट जंगलात सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून पडताळणी करावी. कृषी विभागाने आणि महसूल यंत्रणेने याबाबत पोलिसांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले

प्रतिक्रिया व्यक्त करा