You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत…

आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत…

मध्यवर्ती कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली…

कणकवली

शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या कळपात दाखल झाले आहेत. मात्र आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळे आज कणकवली शहरात दाखल झालेल्या आमदार वैभव नाईक यांचे शिवसैनिकांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढून शिवसैनिकाने शक्तिप्रदर्शन केले.

कणकवली शिवसेना कार्यालयात आलेल्या आमदार वैभव नाईक यांचे आज शेकडो शिवसैनिकानी स्वागत केले. यावेळी भगव्या स्क्राफ, व भगवे झेंडे याने वातावरण भगवेमय झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण स्पिकर द्वारे लावून निष्ठावान शिवसैनिकांना साठी बाळासाहेब आदर्श होते. हे सांगितले जात होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक निष्ठावान असल्याच्या भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला सेनेचा वाघ आला अशी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, नगरसेविका मानसी मुंज, बाळू मेस्त्री, कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राठोड, रिमेश चव्हाण, तेजस राणे, सोहम वाळके, गोट्या कोळसुलकर, शंकर पार्सेकर, सरपंच प्रमोद कावले, अजित काणेकर, शहर प्रमुख शेखर राणे, निसार शेख, अनिल हलदिवे आदि बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शिवसैनिकांनी रॅली काढली.

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार आमदार वैभव नाईक यांनी अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वैभव नाईक यांनी गेलेले आमदार परत लवकर मागे येतील असा विश्वास व्यक्त केला. शिवसैनिकांनीही जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा