You are currently viewing दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्यासाठी प्रशिक्षण : राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीपासून प्रारंभ

दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्यासाठी प्रशिक्षण : राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीपासून प्रारंभ

अमरावती :

 

महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कलेक्टर व्हावे यासाठी अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी ही गेल्या 22 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये काम करीत आहे. त्यासाठी पंजाबराव देशमुख अकादमीने संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास पंधरा हजार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. या अकादमीमध्ये लातूरच्या संस्कार प्रकाशनाच्या माध्यमातून दुसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कलेक्टर होण्यासाठी जूनियर आयएएस हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी नाममात्र एक रुपया प्रति दिन एवढे शुल्क आकारण्यात येते. याशिवाय या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गांची स्पर्धा परीक्षेची विनामूल्ये पुस्तके घेण्यात येतात. त्यांची नियमितपणे सराव परीक्षा घेण्यात येते. त्याचबरोबर त्यांना गुणपत्रिका प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येतात. या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद असून अनेक सनदी अधिकाऱ्यांनी तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून आतापर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जवळपास 350 सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष प्रा. पल्लवी काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. यावर्षी दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण हा उपक्रम येत्या 26 जून रोजी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनापासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था सारथीचे संचालक श्री डी डी देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या उपक्रमांमध्ये दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी व सातवी या वर्गातील मराठी इंग्रजी व सेमी माध्यमातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ज्या शाळांना किंवा विद्यार्थ्यांना पालकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे संस्थापक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

 

प्रकाशनार्थ – प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक – डॉ. पंजाबराव देशमुख आकादमी.

अमरावती कॅम्प

प्रतिक्रिया व्यक्त करा