You are currently viewing कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतण्यासाठी आर्थिक भुर्दंड..

कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतण्यासाठी आर्थिक भुर्दंड..

 

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांसाठी व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन;कणकवली भाजपा सरचिटणीस महेश गुरव यांचा इशारा..

 

कणकवली/रुपाली कलिंगण :

कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या रुग्णांना बरे झाल्यानंतर सोडण्यात येत.मात्र घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्था नसल्यामुळे खाजगी वाहनांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात.कारण ते कोरोनाग्रस्त होते व त्यांच्या हातावर कॉरंटाईनचा शिक्का मारला जातो. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्या रुग्णांना स्वीकारले जात नाही,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करावी.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली भाजपा  सरचिटणीस महेश गुरव यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो रुग्ण दररोज कोरोनाचे वाढत आहेत.जे रुग्ण जिल्हा रुग्णालयात बरे होतात,त्यापैकी ज्यांना शक्य ही त्यांची खासगी वाहनांची व्यवस्था होते. मात्र सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण आहेत. त्यांना ओरस येथून आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी कोरोनाग्रस्त असलेला रुग्ण म्हणून वाहन व्यवस्था नाकारली जाते.कुठल्याही वाहनांमध्ये त्यांना घेतले जात नाही. कारण त्यांच्या हातावर कॉरंटाईनचा शिक्का असतो.तसेच नागरिकांमध्ये अद्यापही कोरोनाबद्दल भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे प्रशासनाने संबंधित रुग्णांना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था  करण्यात यावी किंवा जिल्हा रुग्णालयात  त्यांना

कॉरंटाईनचे शिक्के रुग्ण गावात पोहोचल्यानंतर आरोग्य सेवक याच्यामार्फत मारण्यात यावेत ही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा