जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांचा अप्रतिम लेख
आज दिवसभर लोकांनी आपल्या बापाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण हे उतू गेलेलं प्रेम म्हणजे जसे दूध उतू गेले की खाली उरते ते म्हणजे पाणी. तस आपलं प्रेम आहे. आपण रोज आपल्या प्रत्येक मागण्या घेऊन बापाकडे जातो आणि एखादी मागणी पूर्ण झाली नाही की मग रुसवे फुगवे धरून कितीतरी काळ बोलत नाही. हल्लीच्या मुलांना आणि मुलींना आपल्याला बोलले हे चालत नाही खपवून घेत नाही ते आणि जरी चुक असली तरीही माघार घेणं म्हणजे जणू महायुद्धापराभव वाटतो त्यांना. चुकीच्या मार्गाने जाऊ न देणे ही बापाची जबाबदारी जरी असली तरिही आपल्या मुळे बापाला खाली पहायची वेळ येऊ नये हे आपले कर्तव्य आहे. आपण चुकतो हे ठीक आहे पण जाणूनबुजून चुकने हा मूर्खपणा आहे. आपण आपल्या शंभर समस्या वडिलांना सांगतो पण बाप कधी आपली परिस्थिती सांगतो का.
तो नेहमीच म्हणतो तू पुढं हो पोरा मी आहे की पाठीशी. म्हणून जर आपल्याला घडवण्यासाठी बाप पाठीमागे असेल तर आपण स्वावलंबी झाल्यावर आई बापाला सोबत तरी घेऊन चालावे. जर अधिक शिकल्यामुळे समाजात आई वडिलांच्या मुळे अपमान वाटत असेल तर तुम्ही बापासारखे अडाणी असलेले कधीही चांगले. कारण आडण्यांचे आईवडील कधीच वृद्धाश्रमात जाताना दिसत नाही. समाजात आपली मान खाली होईल या भीतीने सुशिक्षित अडाणी आपल्या आईबाबांना सोबत ठेवत नाही. याउलट जर मोठ्या बंगल्याच्या घरात आईबाबा असेल तर या भामट्यांना कुतूहल होईल. अडाणी विशेषतः शेतकऱ्यांचे आईवडील कधीही तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाही. कारण बाप नावाचं एक आभाळ आहे जे प्रसंगी कडाडले तर दुसऱ्या प्रसंगी अंतराला चिंब करणाऱ्या सरी होऊन बरसत. त्यासाठी फक्त सुशिक्षित नाही तर त्यापेक्षा अधिक गरजेचे आहे संस्कारी होणं. आणि संस्काराचा धडा हा बंद खोलीत शिकवता येत नाही.
यशाची जर पाठीवर थाप पाहिजे।
त्यासाठी घरामध्ये बाप पाहिजे।।
रामदास आण्णा
गाव: तीर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरूळ
जिल्हा. मातृतिर्थ बुलढाणा
7987786373