सिंधुदुर्गातून शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांची पहिली प्रतिक्रिया
जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह सर्व पदाधिकारी शांत
सिंधुदुर्गातील जनता आणि सच्चा शिवसैनिक गद्दारांना माफ करेल काय? असा परखड सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. माजी राज्यमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर सकाळी गुहाहाटी येथे दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्गातून डॉ. परुळेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
महा विकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जे “ऑपरेशन लोटस” राज्यात चालू आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे.
हे कोण घडवत आहे ते सर्वश्रुत आहे.
शिवसेना फोडण्यासाठी आमदार पळवापळवी करून भाजपप्रणीत सत्ता असलेल्या गुजरात मधील सुरत आणि मग आसाम मधील गुवाहाटी येथे आमदारांची जी बडदास्त ठेवली जात आहे, त्यामागे कोणत्या पक्षाची यंत्रणा कार्यरत आहे हे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील जनतेला बरोबर माहित आहे.
अशा काळात ज्या पक्षाने आपल्याला आमदार/मंत्री/पालकमंत्री केलं ते लक्षात ठेवून पक्षनिष्ठा ठामपणे दाखवणे गरजेचे आहे.
मंत्री पद (पालकमंत्री पद) पदरात पाडून घेण्यासाठी घाईघाईने गुवाहाटीला जाणे ही गद्दारी आहे.
सिंधुदुर्गातील जनता आणि सच्चा शिवसैनिक अशा गद्दारांना माफ करेल काय? असा सवाल डॉ. परुळेकर यांनी केला आहे.
ही वेळ खरंतर स्वार्थ साधण्याची नाही… पक्षनेतृत्वा सोबत खंबीरपणे उभे राहण्याची आहे.
हिंदूह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब यांचे नाव घेऊन पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांना दगाफटका करणाऱ्या अवलादीला सच्चा शिवसैनिक कधी माफ करेल का?
मंत्री पदाच्या लाचारीसाठी गुवाहाटीला पळणाऱ्यांचा धिक्कार असो. अश्या शब्दात त्यांनी निषेधही व्यक्त केला आहे.