वैभववाडी
प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात आणि सांसारिक व्यापामध्ये बिझी आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगा आणि प्राणायाम आवश्यक आहे असे प्रतिपादन वैभववाडी पतंजली योग समितीचे सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.
२१ जून,२०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम वैभववाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण देसाई व श्री. सुरज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रा.एस.एन.पाटील प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
२१ जून,२०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.२१ जून,२०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन “मानवतेसाठी योगा” ही संकल्पना घेऊन विविध कार्यक्रमांनी सर्वत्र साजरा करण्यात आला.
यावेळी प्रा.पाटील यांनी आहार-विहार व निद्रा यांचे संतुलन महत्त्वाचे असून उत्तम आरोग्यासाठी योगा आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज योगा प्राणायाम केल्यास शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. योग आणि प्राणायाम म्हणजे काय ? तो कधी आणि कोठे करावा, कोणी करावा याबाबत माहिती दिली. तसेच वॉर्मअप, सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, योगासने यांची माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव यांनी योग दिनाचे महत्व सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. पोलिस उपनिरीक्षक श्री. प्रवीण देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.