You are currently viewing 15 वर्ष राजकारण करून ही मंगेश लोके तालुक्यातच , 5 वर्ष राजकारण करत असलेले 29 वर्षीय नवलराज काळे आपल्या कामाच्या जोरावर जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय

15 वर्ष राजकारण करून ही मंगेश लोके तालुक्यातच , 5 वर्ष राजकारण करत असलेले 29 वर्षीय नवलराज काळे आपल्या कामाच्या जोरावर जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय

*यावरून कोणाची राजकीय उंची मोठी ते जनता ठरवेल-शिवसेनेच्या दाखल्याची गरज नाही*

*लोरे जिल्हा परिषद युवा शक्ती केंद्र प्रमुख विवेक पवार*

*वैभववाडी-*

नवलराज काळे यांच्या वरती झालेली टीका ग्रामपंचायत सदस्य लक्ष्‍मीबाई बोडेकर यांच्या नावाचा वापर करून मंगेश लोके यांनी केली आहे. वेळ आल्यानंतर पुराव्यानिशी ते सिद्ध करू. मंगेश लोके समाजाची ढाल करून नवलराज काळे यांच्या वरती निशाणा साधत आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर नवलराज काळे यांच्याशी थेट सामना करावा असे आव्हान करत भारतीय जनता पार्टीचे लोरे जिल्हा परिषद युवा शक्ती केंद्र प्रमुख विवेक पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
पवार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नवलराज काळे यांच्यावरती केलेली टीका ही बिनबुडाची आहे कोणाची किती राजकीय उंची आहे ते जनतेला ठाऊक आहे. पंधरा वर्षे राजकारणात काम करून देखील मंगेश लोके तालुक्यातील राजकारणात सक्रिय पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न मंगेश लोके करतात आणि पाच वर्षात राजकारणात आणि समाजकारणात लोकाभिमुख कामे करून 29 वर्षीय नवलराज काळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय यावरून कोणाची राजकीय उंची उंच आहे हे जनतेला ज्ञात आहे. नवलराज काळे यांच्या राजकीय उंचीबाबत शिवसेने ने बोलने उचित नाही.मूर्ती लहान कीर्ती महान अशा व्यक्तीमत्वाचे नवराज काळे यांच्यावर ती टीका करताना दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो हे लज्जास्पद. यावरून स्वयंघोषित पुढारी कोण आहे हे सिद्ध होते.
नवलराज काळे यांनी सर्व कार्यरत असलेल्या पदांना योग्य न्याय दिला आहे. याला तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता साक्ष आहे. सडूरे शिराळे ग्रामपंचायतीचे सक्षम सदस्य म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत अबाधित आहे. शिवसेनेने दावा केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे जाहीर करावी..? ज्यांच्या नावाचा वापर करून लोके यांनी नवलराज काळे यांच्या वरती निशाणा साधला आहे त्या तांबळघाटीच्या लक्ष्मी बोडेकर यांच्या वाडीतील विकासासाठी नवलराज काळे यांचे मोठे योगदान आहे. गावातील सर्व विकास कामांची यादी करून ती कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता नवलराज काळे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. गावातील रस्ते पाणी आरोग्यविषयक शैक्षणिक वैयक्तिक लाभाच्या गोष्टी अशा अनेक विकास कामांमध्ये नवलराज काळे यांनी हिरीरीने भाग घेऊन सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पदावरुन काम पाहिले आहे त्यांच्या कामाची दखल जनता नक्कीच घेईल. गावात नवलराज काळे यांनी केलेल्या कामाचे श्रेय शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके व त्यांचे सहकारी घेण्याचा खटपट नेहमी करत असतात परंतु ते त्या ठिकाणी अपयशी ठरतात.
आगामी निवडणुकीत नवलराज काळे रिंगणात उतरले तर ते नक्कीच निवडून येतील नवलराज काळे यांची काळजी शिवसेनेने करू नये. परंतु शिवसेनेचा उमेदवाराचे डिपॉझिट राहते की नाही याची मात्र त्यांनी काळजी घ्यावी.

शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आपल्या खंबाळे गावातील धनगर वस्तीच्या विकासाचे प्रश्न सोडवावे मगच सडूरे शिराळेतील धनगर वस्त्यांचा विकास केला असा दावा करावा.
शिराळे धनगरवाडी येथील सर्व धनगर समाजाच्या विकासाच्या समस्या नवराज काळे यांच्याच माध्यमातून मार्गी लागल्या. धनगर वाडी कडे जाणाऱ्या पावणारी सातवा ची दुरुस्ती पावणाई साकवा पर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे शिराळे शेळके वाडी धनगर वाडी येथील पाणी प्रश्न, नवीन रस्ता 23 नंबर नोंद करणे ही सर्व कामे जनतेच्या सहकार्यातून नवलराज काळे यांनी पूर्ण केले आहे या कामाचे मंगेश लोके शी काही संबंध नाही. सडूरे शिराळे गावासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झालेला आहे.हा निधी मिळवण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष नासिर काजी, माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, खांबाळे पंचायत समिती भाजप शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, त्यामुळे भविष्यात भाजपची ग्रामपंचायत याठिकाणी निवडून येईल यात तिळमात्र शंका नाही.
नवलराज काळे यांच्या वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून झाले असून तांबळघाटी वाडीचे काम याआधी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या योगदानातून झाला. तर तांबळघाटी रस्त्याच्या मोरीचे काम 14 वित्त मधून करण्यात आले. तर पाच कोटी 30 लाख रुपये मंजुरी भाजपच्या काळात झालेल्या होती. 2019 ला शिवसेना सत्तेवर आल्यावर त्यावेळी या संपूर्ण कामाचे री टेंडर करून ते काम शिवसेनेच्या पदरात पाडून घेण्याचे पाप शिवसेना नेत्यांनी केले, यामध्ये वाया गेलेला वेळ न भरून येणार आहे. त्यामुळे या दोन्ही वाडीचा विकास शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केला हा दावा खोटा आहे. अशा खोटारडेपणा ला जनता नक्कीच यांना मतपेटीतून उत्तर देईल.
नवलराज काळे यांनी ग्रामपंचायत स्तरावरून 15 वित्त आयोगाची कामे अतिशय योग्य प्रकारे मार्गी लावत आहेत. आवश्यक त्या ठिकाणी संमतीपत्र बक्षीस पत्रे दानपत्रे करून घेण्यासाठी ग्रामस्थांच्या मिटिंग घेऊन विरुद्ध भूमिका असणाऱ्या ग्रामस्थांची समजूती काढून रस्त्यासाठी पाण्याच्या टाक्या साठी जागा उपलब्ध करून संपूर्ण गावातील पाणीप्रश्न व रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यात यशस्वी झाले आहेत. यासाठी जनतेतून नवलराज काळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
15 वित्त आयोग (ग्रामपंचायत स्तर) कामाचे भूमिपूजन,उद्घाटन करून शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके आपली राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. भारतीय जनता पार्टी सोबत युती असताना निवडून येणाऱ्या मंगेश लोकेंनी भाजपचे नवलराज काळे यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करू नये.लोके यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पुन्हा निवडून येऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवावे विवेक पवार यांचा लोके ना सल्ला.
कालपर्यंत नवलराज काळे यांच्या सोबत असणाऱ्या लक्ष्मीबाई बोडेकर यांनी अचानक काळे यांच्या विरोधात टीका करणे हे शंकास्पद आहे.यामागे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आपल्या स्वतःच्या मनाने ही खोडसाळ टीका बोडेकर यांच्या नावाने दिली आहे आणि ते वेळ आल्यानंतर पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करू. मंगेश लोके ने समाजाची ढाल करून नवलराज काळे त्यांच्यावर निशाणा साधून समाजात व गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये हिंमत असेल तर नवलराज काळेंशी थेट सामना करावा. तुमचा समाचार घ्यायला भाजप युवा मोर्चा नेहमी तयार असेल असे प्रति आव्हानच शिवसेनेला युवा मोर्चा शक्ती केंद्रप्रमुख विवेक पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =