जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना
आज असे मी स्वप्न पाहिले
त्यात गझल फुलांचे झेले होते
गुणगुणत होते गझल अशी मी ऊन
मग वृत्तांची बरसातच होते
मना मनात हळुवार फिरू लागले
ती लगावली अन् तो मतला
अलामती ची गम्मतच न्यारी
काय म्हणावे अल्लड काफिया ला
काफियाची विनवणी केली
रदीफ बिचारा रुसून बसला
काय करावे काही सुचेना
हात जोडले मग गझलेला
विनवणी केली आर्जवे केली
तूच यावे माझ्या मन्मनी
गझल सखी तू माझी म्हणुनी
लेखणी वर यावे स्वार होऊनी
बघता बघता पहाट झाली
गझल लिहूनी पूर्ण जाहली
उठवीत होती कन्या मजला
प्रत्यक्षात….. गझल लिहायची राहून गेली
सौ. अर्चना मायदेव
पुणे