शिमला :
माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांनी शिमला येथील घरात आत्महत्या केली आहे. कुमार हे डीजीपी आणि सीबीआयचे प्रमुखही राहिले आहेत. शिमलाचे एसपी मोहित चावला म्हणाले की, मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी त्यांच्या घरी आत्महत्या केली.
अश्विनी कुमार हिमाचल प्रदेशचे डीजीपी म्हणून ऑगस्ट २००६ ते जुलै २००८ पर्यंत काम करत होते. यानंतर त्यांची सीबीआय चीफ म्हणून नेमणूक झाली. अश्विनी कुमार या पदावर २ ऑगस्ट २००८ ते ३० नोव्हेंबर २०१० या काळापर्यंत होते. यानंतर त्यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. अश्विनी कुमार यांनी जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या काळात हे पद सांभाळले होते.