You are currently viewing कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा गुणगौरव समारंभ

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा गुणगौरव समारंभ

कणकवली

कुडाळदेशकर गौड ब्राहम्हण सेवा मंडळ, ता. कणकवली यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील सन २०२१/२२ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता संस्थेच्या फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर गुणगौरव कार्यक्रमात सन २०२२ मध्ये झालेल्या या परीक्षत ८०% आणि त्यापेक्षा अधिक व इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७०% आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण मिळविल्या आणि सर्व स्पर्धात्मक एन. टी. एस. एम. टी. एस. बी. डी. एस. आलम्पीयाड इ. परीक्षेत कणकवली तालुक्यात १ ते ३ क्रमांक प्राप्त करणा-या गुणवंतांसह कलाका साहित्य क्षेत्रामध्ये व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पाचवी व आठवी इयत्तेत २१० त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य संपादित केलेले गुणवंत व सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक,शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त ज्ञातीबांधवाचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे

सदर कार्यक्रमास गुणवंत विद्याथी, त्याच पालक व सर्व ज्ञाती बांधवांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

तालुक्यातील अशा गुणवंतनी आपल्या गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती मंगळवार दि. ५ जुले २०२२ पर्यंत खाली निर्दिष्ट केलेल्या संस्थेच्या पदाधिकान्याकडे देण्याची व्यवस्था करावी. सोबत आपला संपूर्ण दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक देणे यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क – १) अपी शेठ गव्हाणकर आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली

फोन नं. ९४२२५८४९००

२) श्री. रामचंद्र तथा बाळा बावकर

स्वामी समर्थ इलेक्ट्रिक दुकान पोस्ट ऑफिसनजिक कणकवली फोन नं. ९४२१३२२७१५

३)श्री राजेश महादेव आजगांवकर

गजानन इलक्ट्रिकल, एस.टी. स्टैंड नजिक फोन नं. ९४२१२६६४६४.

४)श्री अरुण वसंत सामंत,

भगवती प्रिंटिंग प्रेस फोंडा फोन नं. ९४२३३००००२

[[५] प्रथमेश कमलाकर महाजन

फोंडा घाट बाजारपेठ फोन नं. ९६७३२१५३५१

प्रतिक्रिया व्यक्त करा