आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत असलदे येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कितीही संकटे आली तरी शिवसेना डगमगणार नाही. आलेल्या कोणत्याही संकटावर मात करीत शिवसेना वाढतच राहणार याचा प्रत्यय आज कणकवलीत आला. कै. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात असलदे येथील भाजपच्या पदाधिकारी कार्येकर्ते यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. राज्याचे राजकारण पूर्णता ढवळून गेले असताना देखील या पक्ष प्रवेशामुळे नागरिकांचा शिवसेनेवर असलेला ठाम विश्वास दिसून आला.
यामध्ये असलदे भाजपचे बुथप्रमुख प्रदीप हरमळकर, भाजपचे ग्रा.पं. सदस्य दिनकर दळवी, ग्रा.पं. सदस्य प्रतिभा खरात, ग्रामविकास सोसायटी सदस्य प्रकाश खरात, जयप्रकाश पाताडे, अनंत परब, सीताराम डगरे, सचिन हरमळकर, स्वरा डगरे , रोहिणी जेठे, सायली जेठे, हर्षाली लोके, जान्हवी लोके, मधुरा लोके, प्रवीण खरात कसवण येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी उदय सर्पे आदींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, बाळा भिसे, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जयभारत पालव, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, शेखर राणे, सचिन आचरेकर,बाळू मेस्त्री, बाळू पालव, भूषण परुळेकर, प्रतीक्षा साटम, दिव्या साळगावकर, असलदे येथील सुरेश मेस्त्री ,लक्ष्मण लोके ,विजय डामरे, विजय परब , महेश लोके, आत्माराम घाडी, उपविभाग प्रमुख तात्या निकम,अतुल सदडेकर, अबू मेस्त्री, राजा म्हसकर, इमाम नावलेकर, मज्जीद बटावले, बबन मुणगेकर आदी उपस्थित होते.