कोळसा जंगलात सापडल्याने खळबळ उडाली
पोलीस अधीक्षक आता तरी स्वतःहून लक्ष देतील का?भीतीपोटी दबक्या अवाजात प्रश्न उपस्थित
बांदा :
गोवा- महाराष्ट्रच्या सिमेवर कास शेर्ले हे गाव असल्याने या भागातुन तस्कर मोठ्याप्रमाणात चोरटी वहातुक करतात आरोसबाग पुल बनवण्यासाठी आरोसबाग वासियानी गेली ५० वर्षे अथक परिश्रम घेतले त्याच्या परिश्रमला यश मीळाल्याने आज हा पुल झाला आहे.
मात्र तस्कर या पुलाचा गैरवापर करत आहेत. या मार्गाने गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची मोठ्या प्रमाणात वहातूक करत असताना शेर्ले जंगलामध्ये मोठ्याप्रमाणात चोरटा दगडी कोळसा ठेवल्याने खळबळ उडाली आहे. हा दगडी कोळसा नेमका ठेवला कोणी? कशासाठी ठेवण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थाना पडले असल्याने दबक्या आवाजात चर्चा करत आहेत मात्र भीतीपोटी याची खबर कोण पोलीसाना देण्यास बघत नाही. याची पोलिसांनी चौकशी करण्याची अपेक्षा करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
यात मोठे हात पुढे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जातेय. अमोने गोवा येथुन झाराप रेल्वे स्टेशन येथे हा माल येतो आणि तेथून शेर्ले येथे लंपास केला जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे.तेथून नंतर पुढे हा माल सप्लाय केला जात असल्याचे बोलले जात आहे. बरीच मुले देखील यामुळे पैश्यासाठी आहारी जात असून मोठ्या प्रमाणात हा प्रकार चालू असल्याचे बोलले जात आहे.