You are currently viewing दळवी महाविद्यालयात योगासने व ध्यान करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

दळवी महाविद्यालयात योगासने व ध्यान करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

तळेरे :- प्रतिनिधी

 

तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आजीवन अध्ययन विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने योगासन व ध्यान करून साजरा करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी योग प्रशिक्षक कु.तेजल कुडतरकर व महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक प्रशांत हाटकर यांनी आनापान ध्यानाची व योगाची प्रात्यक्षिक करून घेतली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिस्टिक वेलनेस’ ही संकल्पना मांडत मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांनी महाविद्यालयात रुजवली.

या अंतर्गत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनात्मक विकास साधण्यासाठी खेळ, योगासने, ध्यानाचे उपक्रम महाविद्यालयात नेहमीच आयोजित केले जातात.

‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ औचित्य साधून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा म्हणून महाविद्यालयात ध्यान व योगासने आयोजित करण्यात आली.

योगाची प्रात्यक्षिके योगाची खेळाडू व महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.तेजल कुडतरकर हिने योगाची प्रात्यक्षिके सादर करीत विद्यार्थ्यांकडून ही करुन घेतली.

शिबिराचे सूत्रसंचालन कु.अल्मीरा शिरगावकर हिने केले. प्रास्ताविक सहा. प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी केले. आभार पूजा पाळेकर हिने मानले.

योग शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहा. प्राध्यापक नितीश गुरव व इतर सहाय्यक प्राध्यापक यांनी प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय योगा दिनाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा