जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
योग …
योग योगायोग नाही योग आहे हो जीवन
योग हेच जीवन नी आहे सर्वश्रेष्ठ धन
सर्व रोगांचे औषध शुद्ध ठेवते हो मन
योग करता करता रोमांचित कण कण …
अणुरेणू होई शुद्ध प्राणायाम आहे थोर
चैतन्याचेच भांडार करतात सानथोर
निरामय होई काया तेज योगाचे चढते
रोग काढतात पाय आयुर्मानही वाढते …
गेली सहस्रे कितीक ऋषीमुनींचा हा ठेवा
अशी वाकते हो काया बघूनच वाटे हेवा
एका पायावर तप कसे शरीर पेलती
जगतात सालोसाल अशी त्यांची हो महती..
निट राखण्या शरीर असे उपाय हा नामी
नाही लागत रूपया करा आपल्याच धामी
नको जीम चे नखरे नाही वाढत वजन
अर्धा तास रोज करा तुम्हा सांगते सुजन …
योग आपुलेच धन करा तयाचे जतन
फायदाच फायदा हो नाही खर्च होत धन
तन मनाने करता मिळे सर्व सिद्धियोग
रोज थोडासा सराव पहा करून प्रयोग …
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २२/०६/२०२१
वेळ : १०:५४