*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांची आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*आंतरराष्ट्रीय योग दिवस*
*योग साधना*
आज आतंरराष्ट्रीय योग दिवस म्हणून
योगाभ्यास करतात लोक जगभर
पण एक दिवस करून काय होणार
नियमित करा तर होईल जीवन सुंदर.
प्राचिनकाल तक ऋषी मुनी होते योगी
तेच होते रहस्य त्यांच्या स्वस्थ जीवनाचे
विसरलो होतो आम्ही त्याचे महत्त्व पण
आता कळले सारे फायदे योग साधनाचे.
आसान आणि प्राणायाम करावे नित्य
होईल शरीर बळकट योगाच्या आसनांनी
होते सकारात्मक वृत्ती माणसाची अन्
शरिरातील क्रिया सक्षम त्या प्राणायामानी.
प्राणायमामध्ये कपाल भाती अति उत्तम
सगळ्या रोगास दूर ठेवते एक प्राणायाम
ध्यान साधना करावी नित्य दहा मिनिटे
पहा तणाव मुक्ती, मनःशांती,वृत्ती प्रसन्न.
रोगाने पछाडल्यावर करतात योग साधना
पण जर निरोगी असता रोज केली साधना
तर रोगराईचा स्पर्श ही नाही होणार अन्
करावी लागणार नाही डॉ. ची आराधना.
शोभा वागळे
मुंबई.
२१/०६/२०२२